Tuesday, April 12, 2016

नविन वर्ष संकल्प (2011)

(This is an old unpublished article from 2011)
मी दरवर्षी नविन वर्षाचा काही संकल्प करत नाही, म्हणजे आधी करत असे, पण जमत नसल्याने मग असे संकल्प करणे सोडून दिले. पुण्यात आज काल traffic (मराठीत वाहतूक) खूपच वाढले आहे, म्हणून मग ह्या वर्षी traffic  चे नियम पाळायचे असा ठरवला. (तसे मी नियम बऱ्यापैकी पाळतो बर का, म्हणजे BRT लेन मध्ये जात नाही, हेल्मेट वापरतो इत्यादी इत्यादि ..)
१ तारखेला सकाळीच बॅंकेत जायचा योग आला. जाता येता व्यवस्थित नियम पालन केले. संध्याकाळी COEP batchmates बरोबर Boat Club गेट्टू होते. घरा जवळचे २ सिग्नल्स ठिक होते, जास्त गर्दी नव्हती, पण राजाराम पूल नंतर गर्दी वाढत गेली. मनावर खूपच संयम ठेवून होतो मी.. आस पास च्या लोकांना सिग्नल तोडताना पाहून कसे तरी वाटत होते. ( संकल्प केल्यामुळे मला जाता येत नव्हते ना!!) शनिपार व ABC चा सिग्नल पार केल्यावर शनिवार वाड्या समोरील गर्दी कशीतरी पार केली आणि फ़ार पुढे न जाण्याचे ठरवले व गाडी मॉडर्न कॅफेपाशी पार्क केली आणि सरळ Boat Club  पर्यंत चालत गेलो. नेहमी पेक्षा १५ मिनिटे जास्त लागली, पण traffic जास्त असल्यामुळे लागली असतील असा विचार केला.

तळटीप:
१. संकल्प = Resolution
२. गेट्टू =  Get together

No comments: