Monday, June 13, 2016

घेई छंद.......


"हा छंद जीवाला लावी पिसे" अशी परिस्थिती नसली, तरीही सध्या एक जुना छंद नव्याने जडला आहे किंवा सुरु झाला आहे.. तुम्ही माझ्या नवीन एलिझाबेथ चे फोटो FB वर पाहिले असतीलच, त्याबद्दलचा हा लेख!!!


एलिझाबेथ अर्थात माझी नवीन सायकल:   New Cycle
Make: SUNCROSS Explorer
7x3 gears with front suspension
Front disc brake, rear V brake

सायकल डिसेंबर मध्येच घेतली होती, पण म्हणावा तेवढा उपयोग करत नव्हतो.. त्यासाठी एप्रिल उजडावा लागला!! म्हणतात ना, देर से आये लेकीन दुरुस्त आये... बहुदा असेच झाले असेल ☺☺
थोडक्यात सांगायचे तर गेले महिना भर सायकलिंग सुरु आहे. छान असे  समानव्यसनेषु पार्टनर पण मिळाले आहेत (विराज शेटे आणि  श्रीराम देशपांडे ) 👌👌 त्यामुळे अजून तरी सातत्य टिकून आहे.. 

सेल्फ रिवॉर्ड म्हणून स्वतः ला 2-3 स्पोर्ट्स वेअर, जेल वाली सीट आणि हेल्मेट ला लावायचा btwin चा दिवा घेऊन झाला. तेवढेच motivation, नाही का?

   
BTWIN light




सध्या दररोज नांदेड सिटी, सारस बाग तर रविवारी खडकवासला असे सुरु आहे. लांब पल्ल्याचे कुठलेही goal नसले तरी सायकलिंग करत सिंहगड पायथा जाणे, सिंहगड चढून येणे आणि परत सायकलिंग करत घरी येणे, एवढे साधेच ध्येय ठेवले आहे...पाहू कधी पूर्ण होते ते !!
At Khadakwasla Dam

Khadakwasla Dam

At Vetal tekadi aka ARAI Hill