Wednesday, June 29, 2016

सिंहगड वारकरी

आजपासून पंढरपूर ची वारी सुरु झाली.
वारी निमित्त एका वारकऱ्याचे मनोगत!
---------

पहाटेचे चालणे, सिंहगड
तानाजी कड्यावरील वारे, सिंहगड
कल्याणचा दरवाजा, सिंहगड
नरवीरांची समाधी, सिंहगड
कोंढाणेश्वराचे मंदिर, सिंहगड
टिळकांचा बंगला, सिंहगड।

लिंबू सरबत अन् उकडलेल्या शेंगा, सिंहगड
मडक्यातले दही अन् मसालेदार ताक, सिंहगड
देवटाक्याचं पाणी, सिंहगड
तिखटजाळ कांदाचटणी, सिंहगड
चटकदार भजी, सिंहगड
गरमा गरम पिठलं भाकरी, सिंहगड !

वजन कमी करणे, सिंहगड
ट्रेकिंग ची सुरवात, सिंहगड
हिमालयाची तयारी, सिंहगड
उत्साहवर्धक, सिंहगड!

तरुणाईचा कल्ला, सिंहगड
मित्र मैत्रिणींचा मेला, सिंहगड
सृष्टीचा अबोला, सिंहगड
मनाचा तजेला, सिंहगड !

#मम