Tuesday, November 1, 2016

आंधळा मागतो एक अन् ....

आंधळा मागतो एक डोळा, अन देव देतो दोन !
हे गोष्टींमध्ये वाचलेले एक सुवचन, प्रत्यक्षात उतरले तर किती मज्जा ना... सारखे वाटायचे कधी घडेल का असे, शक्य आहे का? का मग गोष्टीतल्या घटना फक्त गोष्टींमध्येच घडणार!!!
अशी कोणती गोष्ट, जी मी आतुरतेने वाट बघत होतो?
माझा मागील ब्लॉग वाचला तर लक्षात येईल.. हो, बरोबर 10 वी चे गेट टुगेदर (मित्रांचा स्नेह मेळावा)..आता तुम्ही म्हणाल, झाले ना गेट टुगेदर, त्यात विशेष काय!!  हीच तर गंमत आहे, इतके दिवस इतरांना गेट टुगेदर होतंय म्हणून सुखी म्हणणारा मी अचानक त्याहून जास्त सुखी झालो होतो.
वाचायचेय कसे...

दोन एक महिन्यांपूर्वी सुजय शिंदे, महेश केसरकर यांची गाठ पडली, ती पण व्हाट्सअप्प, फेसबुक वर.. हळू हळू ओळखीचा धागा आठवू लागला अन जुनी ओळख नव्याने सुरु झाली. आता सुजय, महेश कोण असा प्रश्न पडला असेल ना? मी 7 वी पर्यंत आजरा (जि. कोल्हापूर) इथे होतो, तेथील हे वर्गमित्र. इतके दिवस मी फक्त प्रसाद परुळेकर, चिन्मय कोल्हटकर यांच्याच संपर्कात (हि पण अतिशोयक्तीच, पण...) होतो. त्यात अजून 2 नावांची भर पडली.  व्हाट्सअप्प ग्रुप लगेच तयार झाला, आणि एक एक मित्र मैत्रिणी जमा होऊ लागले. दररोज जमणारा कट्टा, गप्पागोष्टी यात मस्त वेळ जात होता. ओळखी अजून वाढत होत्या. ग्रुप मधले काही जण (आणि जणी पण 😀) आपल्या अगदी जवळच राहतात, हे ऐकून बरे वाटले, तसेच इतकी वर्षे जवळ असून भेट झाली नाही याचे वाईट ही..
असो. गणपती साठी प्रसाद आजऱ्याला जाणार हा योग पकडून घरीच एक छोटासा मित्र मेळावा घडून आला..तहानलेल्याला 2 घोट पुरतात ना, अगदी तसेच.. चिन्मय, सुजाता, तृप्ती आणि सुप्रिया सोबत प्रसाद ची भेट झाली. त्यावेळी खूप बरे वाटले. मैत्रीची पण एक वीण असते, ती घट्ट होते आठवणींच्या एक एक धाग्याने.. बराच कालावधी (तब्बल 26 वर्षे) लोटल्याने ती वीण सैल होऊन नुसते धागे राहिले होते, त्यातले बरेचसे विरले पण होते. आता काही समान धागे पकडून आणि बरेचसे नवीन शोधून मैत्रीची ही वीण पुन्हा बांधण्याचा घाट घातला आहे. महेश केसरकर आणि सुधीर देसाई यांनी खूपशा मित्र मैत्रिणींना एकत्र करून 2 नोव्हेंबर ला आजरा इथे हा स्नेह मेळावा होत आहे आणि त्यात मी सहभागी होत आहे.. आहे ना खरेच मी भाग्यवान !!

बालपणीचा रम्य काळ आणि रम्य त्या आठवणी
आणीत हसू ओठावर, तर कधी लोचनी पाणी ।
घातला कधी धुडगूस, वाटे पाहेन का ती शाळा
काढून सबबी अनेक, सांगे मना 'आता पुढच्या वेळा'।
आला घडून हा योग शेवटी एकदाचा
जमला आहे आज स्नेह मेळावा मित्रांचा ।

#मम
2 नोव्हेंबर, 2016

No comments: