Saturday, February 25, 2017

My First Biathalon

          मागील वर्षी एक goal ठरवले होते: सायकल वरून सिंहगड पायथा गाठायचे, सिंहगड चढून यायचे आणि परत सायकलिंग करत घरी. त्यादृष्टीने तयारी सुरु होती. एक दोनदा सिंहगड पायथ्यापर्यंत मी आणि विराज जाऊन आलो होतो. एक दिवस आम्ही पानशेत धरणा पर्यंत जाऊन आलो होतो. परंतु पावसाळ्यात सायकलिंग कमी झाले आणि दिवाळीच्या आसपास सायकलिंग बंद झाले. त्यानंतर थंडीचे दिवस सुरु झाले आणि सकाळ चे लवकर उठणे ही !! (अर्थात शनिवार/रविवारच्या सिंहगड वारीसाठी उठायचो ते सोडून ☺☺)

          यंदा जानेवारी पासून नियमित ट्रेकिंग सुरु झाले. 4 वेळा सिंहगड वारी आणि 2 मोठे ट्रेक्स (राजमाची आणि राजगड-तोरणा) झाले होते. 12 फेब्रुवारी (रविवार) सायकल धुवून साफ केली आणि 18 ला संध्याकाळी पहिल्यांदा सायकल बाहेर काढली. निवडणूक प्रचाराची धामधूम सुरु होती. त्या गर्दीतूनच वाट काढत नांदेड सिटी पर्यंत जाऊन आलो. बऱ्याच दिवसानंतर सायकलिंग केले होते, पण चांगला कॉन्फिडन्स आला. त्यानंतरच्या आठवड्यात 3 वेळा (दोनदा नांदेड सिटी आणि एकदा खडकवासला) सायकलिंग झाले.

          शनिवार, 25 फेब्रुवारी..सकाळी लवकर उठलो. आज सिंहगड ला जायच्या ऐवजी पायथ्यापर्यंत सायकलिंग करायचे ठरवले होते. विराज नेमका साताऱ्याला गेला होता, त्यामुळे मी एकटाच थोडं उशिरा (6:20) बाहेर पडलो. उजाडायला लागल्यामुळे बरे होते, नाही तर अंधारात कुत्री मागे लागतात!! नांदेड सिटी जवळ दोघे जण क्रॉस करून पुढे गेले. आपल्यासोबत अजून कुणी तरी आहे हे पाहून बरे वाटले. नाही तर एकट्याने सायकलिंग करायला फार कंटाळवाणे होते. पण थोड्याच वेळात ते भरपूर पुढे गेले, आणि मी एकटा राहिलो. बहुदा नियमित सायकलिंग करणारे असावेत, माझ्यासारखे कधी तरी करणारे नाही ☺☺!! पुढे खडकवासला पाशी एक जण अजून भेटला, पण तो ही तसाच (पुढे) निघाला!! 1 तास 3 मिनिटांमध्ये मी पायथ्यापाशी (आतकरवाडी) पोहोचलो.

घर ते सिंहगड पायथा सायकलिंग (MOOV App)
हॉटेल शिवांजली ला पोचल्यावर 
सिंहगड चढायचे नक्की नव्हते, पण निम्म्या रस्त्यापर्यंत जाऊन येऊ असा विचार केला. त्यामुळे पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घेऊन चालायला सुरुवात केली. चालायचा वेग फारच हळू पण कॉन्स्टंट होता. निम्म्या टप्प्यावर पोचलो तेव्हा प्रदीप (राजगड ट्रेक चा ब्लॉगक1) आणि त्याची बहीण भेटली. ते खाली येत होते. वेळ पाहिला तर 33 मिनिटे..पाहून बरे वाटले. विचार केला, इथेपर्यंत आलोच आहे..जाऊ या वरपर्यंत. मग स्वतःला थोडे पुश करत करत एकदाचे वर पोचलो. टायमिंग (वेळ) पाहिला आणि खूप हायसे वाटले. जवळ जवळ एक तासामध्ये मी वरती आलो होतो.

सिंहगड चढताना वाटेत हा पक्षी दिसला. नाव माहीत नाही, पण खूप सुंदर होता !

शेवटची 5 मिनिटे जोरात आल्यामुळे छातीचा भाता फुलला होता. मोबाईल मधील Runtastic Heart Rate अँप उघडून नाडीचे ठोके मोजले, 139 आले. (अँप बरेचसे accurate आहे +/- 3 bpm).

सिंहगड चा ट्रेल (MOOV App)


Elevation gain (MOOV App)


सिंहगड ट्रेल (गुगल  Fit)
Elevation gain (गुगल Fit )

थोडेसे स्ट्रेचिंग केले, रिफ्रेशिंग लिंबू सरबत पिले आणि खाली उतरायला सुरुवात केली. ऊन वाढू लागले होते, म्हणून फार वेळ थांबलो नाही. परत सायकलिंग करत घरी यायचे होते ना!
उतरताना डावा गुडघा बोलायला लागला होता, म्हणून वेग थोडा कमी केला. उतरताना 50 मिनिटे लागली, नाडीचे ठोके 122 होते.
सिंहगड ट्रेल, उतरताना (गुगल Fit )

Elevation Map, उतरताना (गुगल Fit )

सिंहगड ट्रेल, उतरताना (MOOV App)

Elevation Details (उतरताना, MOOV App)

आता एवढे कष्ट केल्यावर काहीतरी रिवॉर्ड हवेच, नाही का? म्हणून मग हॉटेल शिवांजली मध्ये गरमा गरम पोह्यांवर ताव मारला. सोबत मिसळीचा कट (सॅम्पल) होतेच!


आतकरवाडी पासून डोणजे फाट्यापर्यंत तसा उतारच आहे, त्यामुळे हे अंतर वेगात पार केले. इथेपर्यंत ट्रॅफिक तसे कमी असतेच. फाट्यापासून पुढे हळू हळू ट्रॅफिक वाढू लागले. पण बराचसा भाग उताराचा आहे, धायरीचा फ्लाय ओव्हर आणि वडगाव पूल इथेच जरा चढ लागतो. ट्रॅफिक मधून वाट काढत 52 मिनिटांमध्ये घरी पोचलो. Orbit पासून पुढे सायकल हळू चालवत आलो, त्यामुळे उतरल्यावर नाडीचे ठोके मोजले नाहीत, पण बहुदा 110-120 च्या पट्टीत असतील.
Cycling Map, return (MOOV App)
Cycling map, return (Google Fit)



संध्याकाळी ऑफिस चा fusion कार्यक्रम होता, त्यामुळे आल्यावर मस्त आराम केला, तसेच दुपारी जेवणानंतर मस्त ताणून दिली.
पुढील गोल अजून ठरवलेले नाही. अजून कमीत कमी 1-2दा तरी हेच परत करेन आणि मगच पुढचे गोल!!

1 ब्लॉगक - ब्लॉग लेखक

No comments: